इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी चर्चा करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांचा प्रस्ताव इराणने नाकारला आहे. ट्रम्प यांनी २०१८ मधे अणुकराराविषयीच्या चर्चेतून माघार घेतल्यानंतर ही चर्चा पुुढे सरकू शकली नाही. ट्रम्प यांनी इराणवर नव्याने निर्बंध लादणार असल्याचं सांगितलं आहे. इराणवर लष्करी कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तर इराण प्रत्येक हल्ल्या चोख उत्तर देईल असं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खोमेनी यांनी म्हटलं आहे.
Site Admin | March 31, 2025 8:00 PM | Iran | US
अमेरिकेसोबतच्या अणुकराराला इराणचा नकार
