अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट खासदारांनी फेडरल फंडिंगवर करार केला नाही तर शटडाऊनची परिस्थिती उद्भवणार आहे. तसे झाल्यास लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना ऐन नातळात पगार मिळणार नाही आणि अमेरिकन सरकारच्या सर्व आपत्कालीन सेवा वगळता सर्व गोष्टी ठप्प होतील. कालच्या बैठकीनंतर सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी खर्चाच्या उपाययोजनांवर मतदान होणार असल्याची माहिती दिली आहे.