अमेरिकेकडून इतर देशांना होणाऱ्या आर्थिक मदतीचा ओघ थांबवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. सध्याच्या आर्थिक मदतीचं पुनरावलोकन केल्यानंतर ती परराष्ट्र धोरणाशी सुसंगत आहे किंवा नाही, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच मदतीविषयी पुढचा निर्णय घेतला जाईल, असे आदेश राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यानुसार परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आर्थिक मदतीचा ओघ पुनरावलोकनासाठी थांबवल्याची माहिती मंत्रालयाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रुस यांनी दिली आहे. अमेरिकेनं २०२३ मध्ये १५८ देशांना सुमारे ४५ अब्ज डॉलर्सची मदत केली होती.