अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय काल रात्री घेतला आहे. प्रमुख व्याजदर सव्वाचार ते साडेचार टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं फेडरल रिझर्व्हने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या तिन्ही प्रमुख निर्देशांकात घट झाली आहे.
या निर्णयाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर झालेला दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज सुमारे आठशेहून अधिक अंकांची घसरण दिसून आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २००हून अधिक अंकांनी घसरला आहे. ही घसरण दुपारच्या सत्रापर्यंत कायम आहे.