अमेरिकेनं कालपासून काही देशांकडून १० टक्के इतका कर वसूल करायला सुरुवात केली. ही कर आकारणी काल मध्यरात्रीपासून अमेरिकेतली बंदरं, विमानतळ, सीमा शुल्क गोदामांवर करण्यात येत आहे. या शुल्काची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अधिकृत आदेश काढून केली होती. या निर्णयामुळे अमेरिकचे मित्र देश आणि अन्य देशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरून येणाऱ्या काही वस्तूंवर २५ टक्के इतकी कर आकारणी केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयांचे परिणाम जगभरातल्या शेअर बाजारांवर झाले आहेत.
Site Admin | April 6, 2025 8:41 PM | Donald Trump | US
अमेरिकेची १० % कर वसूलीला सुरुवात
