संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेने आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतील अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थोमस ग्रीन फील्ड यांनी याबाबत सांगितल की संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प्रस्ताव तयार करायला अमेरिकेचा पाठिंबा आहे. भारत, जपान आणि जर्मनी या देशांना सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळाव म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे. मात्र काही देशांचा या नवीन संशोधन प्रस्तावाला विरोध आहे.
Site Admin | September 13, 2024 9:31 AM | India | UN Security Council | US