अमेरिकी लष्करानं पारलिंगी अर्थात ट्रान्सजेंडर व्यक्तींची सैन्यातली भरती बंद केली असल्याची घोषणा केली आहे. यापुढे लिंग बदलाच्या प्रक्रियेसाठी दिली जाणारी मदतही बंद करणार असल्याचंही अमेरिकेच्या लष्करानं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. लिंगभाव ओळखीसंदर्भात अनिश्चिततेनं ग्रस्त अर्थात जेंडर डिस्फोरिया असलेल्या व्यक्तींना सन्मानानं वागवलं जाईल, आणि त्यांच्या देशसेवेच्या इच्छेबद्दलही लष्कराचा आदर कायम राहील असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २७ जानेवारीला यासंदर्भातला कार्यकारी आदेश जारी केला होता, आणि याबाबत पेंटागॉन अर्थान अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेनं ३० दिवसांमध्ये धोरण आखावं असे निर्देश दिले होते.