डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

चीनच्या वस्तूंवर ५० % अतिरिक्त शुल्क आकारणार असल्याची अमेरिकेची घोषणा

चीनमध्ये आयात होणाऱ्या अमेरिकी उत्पादनांवर लादण्यात आलेलं आयात शुल्क जोवर कमी केलं जात नाही, तोवर अमेरिकेत आयात होणाऱ्या चीनच्या वस्तूंवर ५० टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे. अमेरिकेच्या व्यापारी भागिदार असलेल्या सर्व देशांच्या उत्पादनांवर किमान १० टक्के कर लादण्यात येईल अशी घोषणा गेल्या बधवारी ट्रम्प यांनी केली होती. यामध्ये चिनी आयातीवर ३४ टक्के आयात शुल्क लादण्यात आलं आहे. दरम्यान, चीनमध्ये उत्पादित मालावर आयात शुल्काची वाढ करण्यावर चीनी प्रशासनानं तीव्र शब्दांत टीका केली आहे.

 

रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनीही या भरमसाठ आयात करआकारणीनं जागतिक आर्थिक स्थैर्याला सुरुंग लावल्याचा आरोप करत अमेरिकेवर टीका केली आहे. यामुळे सध्या उद्भवलेल्या अस्थिरतेच्या परिस्थितीवर रशिया बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं पेस्कोव्ह यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.

 

ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर यांनीही अमेरिकेनं केलेली आयात शुल्कवाढ ही जागतिक व्यापार आणि ब्रिटनच्या औद्योगिक क्षेत्राला धोका असल्याचं म्हटलं आहे. तर बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी बांग्लादेशी उत्पादनांवर लादलेली आयात शुल्कवाढ तीन महिन्यांनी लांबवावी अशी विनंती करणारं पत्र अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना लिहीलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा