विनेझुएलाने गयानावर हल्ला केल्यास अमेरिका चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी दिला आहे. तेल आणि वायुंचा साठा असलेल्या भागासह दोनही प्रदेशांदरम्यान संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रुबिओ यांनी हा इशारा दिला आहे. अमेरिकन परराष्ट्रमंत्री कॅरिबियनच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात काल गयाना इथं पोहोचले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासन या भागात ऊर्जा क्षेत्रातील श्रोतांसंदर्भात मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देणं आणि बेकायदेशीर स्थलांतर, अंमली पदार्थांची तस्करी तसंच टोळ्यांदरम्यान होणारा संघर्ष रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. त्यांनी काल गयानाचे अध्यक्ष इरफान अली आणि इतर अधिकाऱ्यांशी जॉर्जटाऊनमध्ये चर्चा केली. गयाना सरकारनं अमेरिकन नौदलाबरोबर युध्दसराव करणार असल्याची घोषणा केली.