क्युबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला या देशांच्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लाखो नागरिकांना मिळत असलेलं कायदेशीर संरक्षण येत्या महिन्याभरात काढून घेत त्यांच्या हद्दपारीचा मार्ग अंतिम टप्प्यात असल्याचं अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागानं म्हटलं आहे.
हे निर्देश ऑक्टोबर २०२२ पासून अमेरिकेत राहणाऱ्या या चार देशांमधल्या सुमारे पाच लाख बत्तीस हजार नागरिकांना लागू होणार आहेत. या सर्वांना अमेरिकेत २ वर्ष राहून काम करण्याचा परवाना मिळाला होता. २४ एप्रिल अथवा फेडरल नोंदणी पुस्तकात ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसात या सर्वांना आपलं कायदेशीर संरक्षण गमवावं लागणार आहे.