अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांवर ट्रम्प प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या कुटुंबांना राहण्यासाठी टेक्सासच्या डिली इथं दक्षिण टेक्सास फॅमिली रेसिडेंशिअल सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सेंटर सुरू करणाऱ्या एका ठेकेदारानं सांगितलं की, अमेरिकेच्या स्थलांतरित आणि सीमा शुल्क विभागाबरोबर करार केला आहे. हे सेंटर सुरू करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय स्थलांतरित धोरणानुसार आहे.
Site Admin | March 7, 2025 1:47 PM | US
अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाची कारवाई
