उडदाचे भाव उतरवण्यासाठी सरकारनं सातत्यानं केलेल्या प्रयत्नांना यश आलं आहे. इंदूरच्या बाजारपेठेत तीन पूर्णांक १२ टक्के तर दिल्लीच्या बाजारपेठेत एक पूर्णांक ८ टक्के इतकी घसरण झाली. यंदा तब्बल पाच लाख सदतीस हजार लाख हेक्टर्स इतक्या शेतीक्षेत्रावर उडदाचं पीक घेण्यात आलं. पर्जन्यमान चांगलं राहील तर यंदा महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू या राज्यात उडदाचं पीक जोमानं येण्याची शक्यता आहे.
Site Admin | July 10, 2024 7:49 PM | उडद
उडदाचे भाव उतरवण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांना यश
