डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

WPL :- स्पर्धेत आज यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना

महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत आज यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. बंगळूरू इथं संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं आत्तापर्यंत झालेल्या तीनपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे तर, यूपी वॉरियर्सनं अद्याप एकही सामना जिंकलेला नाही त्यामुळे ते पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असतील.

 

दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर ४ गडी राखून विजय मिळवला. पहिली फलंदाजी करताना बंगळुरुनं मुंबईसमोर विजयासाठी १६८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, हे लक्ष्य मुंबईनं १ चेंडू राखत पार केलं. या सामन्यात ३ खेळाडू बाद करणाऱ्या मुंबई इंडिअन्सच्या अमनजोत कौर हीला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवलं गेलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा