यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत निवड झालेले उमेदवार आता भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर सेवांमध्ये निवड होण्यासाठी व्यक्तिमत्त्व चाचणी मुलाखतीला सामोरे जातील. या मुलाखतीच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Site Admin | December 10, 2024 1:02 PM | UPSC