केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून UPS-Unified Pension Scheme अर्थात एकीकृत निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध होत आहे. NPS अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना, तीन महिन्यात NPS किंवा UPS यापैकी एक पर्याय निवडायचा आहे. एक एप्रिल २००४ नंतर केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या २३ लाख कर्मचाऱ्यांना यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येईल. यात किमान २५ वर्ष सरकारी सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वर्षभराच्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या किमान ५० टक्के इतकं निवृत्ती वेतन मिळेल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या निधनानंतर कुटुंबाला निवृत्ती वेतनाच्या ६० टक्के इतकी रक्कम मिळेल. किमान १० वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना UPS अंतर्गत किमान १० हजार रुपये निवृत्ती वेतनाची हमी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय निवडण्याची मुदत काल संपणार होती, सरकारने यासाठी आता वर्षभराची मुदतवाढ दिली आहे.
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय आजपर्यंत निवडायचा होता. त्यांना आता वर्षभराची मुदतवाढ सरकारनं दिली आहे.