डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लोकसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ

लोकसभेच्या आजच्या कामकाजात आभार प्रस्तावावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषणात केलेल्या एका वक्तव्यावरुन गदारोळ झाला. त्यांच्या विधानावर प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि लोकसभा सभापतींनी आक्षेप घेतला. 

राहुल गांधी हिंदू धर्मीयांना सरसकटपणे हिंसक म्हणत असल्याचं सांगत, हे गंभीर असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. तर गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. सभापती ओम बिर्ला यांनी संसद सदस्यांनी सभागृहाचं पावित्र्य राखावं अशी टीका केली. नंतर राहुल गांधी यांनी आपलं विधान विशिष्ट समुदायासाठी नसून ते भाजपासाठी होतं असं स्पष्टीकरण दिलं. 

आभार प्रस्तावावरच्या चर्चेत भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी गेल्या काही वर्षांत सरकारनं विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोकहित आणि आर्थिक वाढीच्या दृष्टिने कार्य केल्याचं ठाकूर यांनी म्हटलं. दरम्यान, विरोधी पक्षांचे नेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेतील गोंधळ, अग्निवीर योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विषयांवरून प्रश्न उपस्थित केले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा