डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 2, 2024 1:52 PM | UPI

printer

जुलै महिन्यात देशभरात युपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांनी गाठला २० लाख ६४ हजार कोटी रुपयांचा टप्पा

यंदाच्या जुलै महिन्यात देशभरात युपीआय आधारित व्यवहारांमध्ये वाढ होऊन ते २० लाख ६४ हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याचं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काल जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. युपीआय द्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांमध्ये दर वर्षी ३५ टक्के वाढ होत असल्याचं यात म्हटलं आहे. जुलैमध्ये एकूण युपीआय व्यवहारांची संख्या जवळजवळ ४ टक्के वाढून १४ अब्ज ४४ कोटींवर पोहोचली, तर दैनंदिनव्यवहारांचं सरासरी प्रमाण ४६६ दशलक्ष इतकं होतं. युपीआय परदेशातल्या काही देशांमध्ये सुरु झाल्यामुळे, तसंच रूपे क्रेडिट कार्ड युपीआयशी जोडल्यामुळे दर महिन्याला जवळजवळ ६० लाख नवीन वापरकर्ते युपीआयशी जोडले जात असल्याचं यात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा