युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयद्वारे या वर्षी ऑक्टोबरमध्ये १६ अब्ज ५८ कोटींहून अधिक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांमधे सुमारे २३ कोटी ४९ लाख रुपयांची देवाण घेवाण झाली. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यात ४५ टक्के वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं २०१६ मध्ये ही सुविधा दाखल केली. यात अनेक बँक खाती एकाच मोबाईल ॲपमध्ये सामायिक करून डिजिटल पद्धतीनं आर्थिक व्यवहार करणं सहजशक्य झालं आहे. यामुळं रोखविरहित अर्थव्यवस्थेकडे देशाची वाटचाल सुरू आहे. या पेमेंट इंटरफेस आंतरराष्ट्रीय पातळीवरही पसंती मिळाली असून संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशस अशा सात देशांमध्येही ही सुविधा वापरली जात आहे.
Site Admin | December 2, 2024 1:06 PM | UPI