तांत्रिक बिघाडामुळे देशभरात आज युपीआयच्या सेवा विस्कळीत झाल्यानं कोट्यावधी ग्राहकांची गैरसोय होत आहे.
यामुळं अनेक बँकांच्या ॲपच्या कामावर परिणाम झाला आहे. ही तांत्रिक अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं कळवलं आहे.
दररोज सरासरी ५९ कोटी व्यवहार युपीआय द्वारे होतात आणि त्यातून ८० हजार कोटी रुपयांची देवाणघेवाण होते.