मनोरंजन उद्योग मोठ्या उद्योगांपैकी एक असून, आगामी काळात याचा मोठा विस्तार होणार असल्याचं प्रतिपादन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. एका खाजगी वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. सरकारने पुढील महिन्यात मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट म्हणजेच वेव्ह्ज परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेमुळे भारतीय कलाकारांना कंटेट तयार करण्यासाठी आणि आपली कला जागतिक पातळीवर पोहचवण्यासाठी उपयोग होणार असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.