डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दिवाळी आणि छठ पूजेसह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर,उत्तर रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्या

दिवाळी आणि छठ पूजेसह आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर, उत्तर रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आजपासून पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत विशेष गाड्यांच्या 195 अतिरिक्त फेऱ्या चालवणार आहे. या गाड्या प्रामुख्याने नवी दिल्ली आणि आनंद विहार रेल्वे स्थानकांवरून पूर्वेकडील प्रदेशांसाठी रवाना होतील.

 

उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार वर्मा यांनी आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली. प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी या वर्षी एक लाख सत्तर हजारांहून अधिक अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहेत. या विशेष गाड्यांमध्ये अनारक्षित श्रेणीतील प्रवाशांसाठी सुमारे 54 हजार अतिरिक्त जागा उपलब्ध करुन दिल्या असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा