सर्वसामान्य लोकांना कायद्याची मुलतत्त्वे जर सोप्या भाषेत समजाऊन देता आली नाहीत तर तो कायदे शिक्षण आणि कायद्याच्या व्यवसायामधला दोष आहे. असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौमधे डॉ. राममनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. कायद्याचं शिक्षण प्रादेशिक भाषेत मिळायला हवं यावर त्यांनी भर दिला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. लोहिया विद्यापीठात हिंदीत कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमाला सुरुवात होईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Site Admin | July 13, 2024 8:40 PM | #दीक्षांत समारंभ | #लखनौ | #सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड