उत्तर प्रदेशातल्या बागपत इथं आज भगवान आदिनाथ निर्वाण लाडू महोत्सवासाठी उभारलेला मंच कोसळल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण जखमी झाले. या महोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात या मंचाची उभारणी केली होती. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविक या मंचावर चढले होते. मात्र, अचानक मंच कोसळला आणि घबराट पसरल्यामुळे सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी झाली. दुर्घटनेतल्या जखमींना बरौत इथल्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदतकार्य जलद करण्याचे तसंच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
Site Admin | January 28, 2025 1:32 PM | Nirvana Laddu Festival | Uttar Pradesh
उत्तरप्रदेश : धार्मिक महोत्सवासाठी उभारलेला मंच कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू, ४० जखमी
