म्हाडा नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नाशिकमधल्या विविध ठिकाणी २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतल्या ४९३ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा काल प्रारंभ झाला. सदनिका सोडती संदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरणही मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते झालं. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी नियमावली, मार्गदर्शक सूचना या पुस्तिकेत नमूद करण्यात आल्या आहेत. इच्छूक अर्जदारांसाठी ही पुस्तिका म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचं अवलोकन करण्याचं आवाहन ठाकरे यांनी केलं आहे .
Site Admin | February 8, 2025 3:38 PM | Mhada
MHADA: सदनिका सोडती संदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण
