डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महान गायक मुकेश ,यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त एका तिकिटाचं अनावरण

भारतीय चित्रपट संगीतातील महान गायक मुकेश , यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल नवी दिल्ली इथे एका तिकिटाचं अनावरण केलं. शेखावत यांनी गायक मुकेश यांच्या संगीतातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा केली. मुकेश यांनी भारतीय संगीताला 1300 हून अधिक भावपूर्ण गाणी भेट दिली आहेत असं मुकेश यांचा वारसा अधोरेखित करताना ते म्हणाले. यावेळी मंत्र्यांनी मुकेश यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. आपल्या वडिलांच्या सांगीतिक प्रवासाची आठवण करून, गायक मुकेश यांचा मुलगा नितीन मुकेश यांनी याप्रसंगी, चाहत्यांनी वर्षानुवर्षे दाखवलेल्या अखंड प्रेम आणि आपुलकीबद्दल मनापासून आभार व्यक्त केले.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा