वाशीम जिल्ह्यात काही दिवसापासून ढगाळ वातावरण असून आज दुपारी बारा वाजता मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा या तीन तालुक्यांत काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसानं मंगरूळपिर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन भिजलं. सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभाव मिळत असल्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे.
मराठवाड्यात आज सर्वत्र पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून ढगाळ वातावरण असून, मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे वेचणीला आलेल्या कापसासह द्राक्ष बागांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.