सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याविषयीची चर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं एकमतानं घेतला आहे. ही चर्चा आता पुढल्या अधिवेशनात होईल. भारताच्या उपस्थायी प्रतिनिधी योजना यादव यांनी या निर्णयावर टीका केली आहे. सरकारांमधल्या आपापसातल्या वाटाघाटींची प्रक्रिया खंडित झाली तर त्याची वैधता संकटात येईल असं यादव म्हणाल्या. २००९ ला वाटाघाटींची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इटली, पाकिस्तान, कॅनडा यांच्यासह बारा देशांच्या विरोधामुळे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं ही प्रक्रिया अनेकदा स्थगित केली. वाटाघटी चालू ठेवण्यात सतत अपयश आल्यामुळे सरकारांमध्ये आपापसात वाटाघाटी करण्यासाठी करण्यात आलेली ही रचनाच निष्प्रभ ठरत असल्याचं ब्राझीलचे स्थायी प्रतिनिधी सर्गिओ डॅनिज यांनी म्हटलं आहे.
Site Admin | August 28, 2024 1:20 PM | UN General Assembly