संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या चर्चासत्रात काश्मिरबाबत चुकीची भूमिका मांडल्यानं भारतानं पाकिस्तानवर कठोर टीका केली आहे. पाकिस्तानचं हे कृत्य चुकीच्या माहितीचा प्रसार करण्याच्या नेहमीच्या सवयीनुसार निंदनीय आणि खोडसाळ असल्याचं भारताचे सुरक्षा परिषदेतले कायम प्रतिनिधी पी हरीश यांनी म्हटलं आहे. एखाद्या महत्वाच्या वार्षिक चर्चासत्रात असत्य राजकीय भूमिका मांडून सर्वांची दिशाभूल करणं सर्वस्वी चुकीचं असल्याची टीका हरीश यांनी केली आहे.
Site Admin | October 26, 2024 6:50 PM | UNSC