डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 25, 2025 3:27 PM | UNSC

printer

United Nations Security Council: जम्मू-काश्मीर कायमच भारताचा अविभाज्य भाग

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बोलताना भारताचे संयुक्त राष्ट्रांमधले राजदूत पार्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानने काश्मीरचा वारंवार उल्लेख केल्याबद्दल टीका केली. जम्मू आणि काश्मीर हा कायमच भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे असं सांगत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सुधारणांवरच्या चर्चेत पाकिस्तानचा निषेध केला. जम्मू आणि काश्मीरचा एक भाग पाकिस्तानने बेकायदेशीरित्या ताब्यात घेतला असून त्याने तो त्वरित मोकळा करावा, काश्मीरच्या उल्लेखाआड बेकायदेशीर घुसखोरी आणि दहशतवादाचं समर्थन करता येणार नाही, असं हरीश यांनी म्हटलं आहे. भारताने शांतता राखून मैत्रीचे संबंध राखण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र पाकिस्तान सतत लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही हरीश यांनी यावेळी केली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा