नयी चेतना 3.0 मोहिमेअंतर्गत १४ राज्यांमधील २२७ लिंगभाव संसाधन केंद्राचं आज केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत उद्घाटन केलं. ही मोहिम २३ डिसेंबरपर्यंत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चालणार आहे. एक साथ, एक आवाज, हिंसा के खिलाफ असं या मोहिमेचं घोषवाक्य आहे.
महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं चौहान यांनी सांगितलं. देशातील लिंग-आधारित हिंसाचार नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आवाज उठवावा,असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
सर्वांचे अधिकार सुरक्षित ठेवत त्यांना हिंसाचारमुक्त ठेवणं हे या मोहिमेचं प्रमुख उद्दिष्ट्य असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सांगितलं.