डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग २०३० पर्यंत सुमारे ४ कोटी रोजगार निर्माण करणारं क्षेत्र बनेल-नितीन गडकरी

देशातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग २०३० पर्यंत सुमारे ४ कोटी रोजगार निर्माण करणारं क्षेत्र बनेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नागपूरमध्ये राष्ट्रीय अग्निशमन  महाविद्यालयात ‘इलेक्ट्रिक वाहनातल्या आगीच्या दुर्घटनांचं व्यवस्थापन’  या विषयावरच्या कार्यशाळेत बोलत होते. इलेक्ट्रिक दुचाकींना लागणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी डीआरडीओ आणि आयआयटीमधल्या तज्ञांच्या समितीनं संशोधन केलं असून एआयएस या सुरक्षा मानांकनानं  बॅटरी सुरक्षा सुनिश्चित केली असल्याचं त्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिक बसेसमध्ये आगीची सूचना देणारी घंटा लावणं अनिवार्य केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणात सापडलेल्या लिथियमच्या साठ्यांमुळे लिथियम आयन बॅटरीची किंमत कमी होईल, असंही ते म्हणाले . 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा