कोकण रेल्वेच्या मार्गाच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत लवकरच संबधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. कोकण रेल्वेच्या मार्गाचं दुपदरीकरण करावं या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी वैष्णव यांना काल निवेदन दिलं होतं. कोकण रेल्वेच्या मार्गावरून दरवर्षी सुमारे ३ कोटी पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र, या मार्गावर एकच ट्रॅक असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.