केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल यांनी आज नवी दिल्लीत विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. तसंच ‘इव्ही ॲज अ सर्व्हिस’ अर्थात, ‘विजेवरच्या वाहनांची सेवा’ या कार्यक्रमाची सुरुवातही त्यांनी केली. या कार्यक्रमाची राजधानी दिल्लीसारख्या प्रदूषण वाढलेल्या शहरांकरता गरज असल्याचं ते म्हणाले. औद्योगिक प्रक्रिया, बांधकाम आणि वाहनांच्या वाहतुकीसारख्या बाबींमुळे प्रदूषण वाढत असल्याचं ते म्हणाले. या प्रत्येक क्षेत्रानं प्रदूषण नियंत्रित ठेवण्याकरता प्रयत्न करायची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.