डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राहुल गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर संसदेत चर्चेचा आणि संवादाचा स्तर खाली गेल्याचा भाजपाचे नेते किरण रिजिजू यांचा आरोप

राहुल गांधी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर संसदेत चर्चेचा आणि संवादाचा स्तर खाली गेल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि भाजपाचे नेते किरण रिजिजू यांनी केला. ते आज नागपूरात भाजपा कार्यालयात वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्या काँग्रेसनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला इतका विलंब केला आणि आणीबाणीच्या माध्यमातून संविधानाचा अपमान केला अशा काँग्रेसला संविधान, दलित, आदिवासी उच्चारण्याचा अधिकार नाही, असंही ते म्हणाले. या हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयक पारित करून गरीब मुस्लमानांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊ, असं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा