केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने 100 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराजा सिंह यांनी म्हंटलं आहे. काल पाटणा इथे वस्त्रोद्योग गुंतवणूकदारांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. सध्या या क्षेत्रात असलेली 176 अब्ज डॉलर्सची उलाढाल 350 अब्ज डॉलर्सपर्यन्त वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. बिहारसारख्या राज्यात वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठी संधी असल्याचं ते म्हणाले. बेतिया आणि मुझफ्फरपूरसोबत, राज्यात बेगुसराय हा तिसरा क्लस्टर विकसित केला जाईल असं आश्वासन सिंह यांनी यावेळी दिलं.
Site Admin | July 20, 2024 6:01 PM | export target | Girija Singh | Union Ministry of Textiles