डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्रात झिका विषाणू प्रकरण पाहता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची मार्गदर्शक नियमावली जारी

महाराष्ट्रात काही ठिकाणी झिका विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं सर्व राज्यांना मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रात 2 जुलैपर्यंत पुण्यात सहा तर कोल्हापूर आणि संगमनेर इथं प्रत्येकी एक अशा एकूण आठ झिकासंक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांनी झिका विषाणू संसर्गासंदर्भात अधिक दक्षता बाळगावी असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत. विशेषतः झिका संक्रमित गर्भवती मातांची तपासणी आणि गर्भाच्या वाढीवर देखरेख ठेवावी आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करावं असं यात म्हटलं आहे. हा आजार संक्रमित एडीस प्रजातीचा डास चावल्यानं होत असल्यानं आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांनी त्यादृष्टीनं देखरेख ठेवत आपला परिसर एडीस डासापासून मुक्त ठेवण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याला तैनात करावं, असे निर्देश देखील राज्यांना दिले आहेत.
निवासी वस्त्या, कार्यालयं, संस्था, बांधकाम सुरु असलेली ठिकाणं, शाळा, महाविद्यालयं आणि आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये कीटकांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि रोगवाहक सूक्ष्मजीव प्रतिबंधक उपक्रम अधिक प्रमाणात राबवावेत यावरही मंत्रालयानं भर दिला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा