या वर्षीच्या खरीप हंगामात कडधान्य लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. नवी दिल्ली इथं खरीप पिकांच्या प्रगतीचा आढावा घेताना ते बोलत होते. तुरीसारख्या कडधान्याच्या लागवडीच्या क्षेत्रात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. कडधान्य उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्याला प्राधान्य असेल, असं ते म्हणाले. उडीद, तूर आणि मसूर या सर्व कडधान्यांच्या १०० टक्के खरेदीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असेल असंही ते यावेळी म्हणाले.
Site Admin | July 12, 2024 12:48 PM | Kharif Crops | Pulses | Shivraj Singh Chouhan