अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी निषेध केला आहे. संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली. पंजाबमध्ये शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बादल यांच्यावर गोळीबार करणारा नारायण सिंग चौरा हा हल्लेखोर बुरैल इथे घडलेल्या घटनेचा सूत्रधार होता, त्यानेच तीन दहशतवाद्यांना तुरुंगातून पळून जायला मदत केल्याचा आरोप बिट्टू यांनी केला आहे.
Site Admin | December 4, 2024 2:19 PM | केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू | सुखबीर सिंग बादल