डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ग्रामीण क्षेत्रातील आर्थिक स्थिती मजबूतीकरणाठी पशुधन विकास महत्वपूर्ण घटक-राजीव रंजन सिंह

देशातील ग्रामीण क्षेत्रातील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पशुधन विकास महत्वपूर्ण घटक आहे; पशुधन वाढीच्या माध्यमातून उत्पादन वाढवल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था निश्चितच सुधारेल, असा विश्वास केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज पुण्यात व्यक्त केला. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या उद्योजकता विकास परिषद २०२५ या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री सत्यपाल सिंग बघेल आणि जॉर्ज कुरियन, महाराष्ट्राच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या परिषदेत सिंह यांनी राष्ट्रीय पशुधन अभियान आणि पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत २० प्रकल्पांचा शुभारंभ केला. एक हजार उद्योजक, लाभार्थी, शेतकरी आणि उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा