ग्राहकांच्या मागणीनंतर चांदी आणि चांदीच्या वस्तूंसाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार करण्याची सूचना ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारतीय मानक ब्युरोला केली आहे. नवी दिल्लीत भारतीय मानक ब्युरोच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय मानक ब्युरोनं त्याच्या स्थापनेपासून विविध क्षेत्रांमध्ये मानके तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचंही ते म्हणाले. गुणवत्ता नियंत्रण आदेश क्यूसीओ केवळ ग्राहकांचे संरक्षण करत नाहीत तर भारतीय उद्योगांची जागतिक विश्वासार्हता देखील वाढवतात. देशातल्या वैद्यकीय उपकरणांचा दर्जा सुनिश्चित करण्याचं श्रेय जोशी यांनी भारतीय मानक ब्युरोला दिलं.