देशात सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ९० गिगावॅट क्षमता असून त्याला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असं मत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केलं. त्यांनी काल मध्यप्रदेशमधल्या खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प हा मध्य प्रदेशातील पहिला आणि देशातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर प्रकल्पांपैकी एक अनोखा प्रकल्प असून त्याची देशातल्या अन्य ठिकाणीही पुनरावृत्ती होऊ शकते, असं सांगत २०३० पर्यंत ५०० गिगावॅट आणि २०४७ पर्यंत १८०० गिगावॅट वीज निर्मितीचं केंद्र सरकारचे लक्ष्य असल्याची माहिती जोशी यांनी यावेळी दिली.
Site Admin | January 5, 2025 9:24 AM | Solar Energy | Union Minister Pralhad Joshi