केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नॉर्वे आणि भारत यांच्यादरम्यान स्टार्टअप पूल सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. उभय देशांच्या व्यापार संबंधांना वृद्धिंगत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं गोयल यांनी सांगितलं. भारतीय उद्योग महासंघ, अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग यांच्या सहकार्यानं मुंबईत आयोजित भारत-नॉर्वे व्यावसायिक चर्चेला संबोधित करताना गोयल बोलत होते. नुकताच भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना यांच्यात नुकताच व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार करण्यात आला. त्यात युरोपियन महासंघातल्या स्वित्झर्लंड, आयर्लंड, नॉर्वे आणि लिंकटेस्टीन या विकसित राष्ट्रांचाही समावेश आहे.
Site Admin | December 9, 2024 1:39 PM | India | Minister Piyush Goyal | Norway