केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल सध्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल सिंगापूरमध्ये विविध जागतिक व्यावसायिक नेत्यांशी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा केली. याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निवेदनात, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे की, भारतातील गुंतवणुकीच्या संधी शोधणं, देशाच्या आर्थिक विकासाचा लाभ मिळवत विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणं या मुद्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आलं असून या चर्चांमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्रासह गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्यात आला. अत्याधुनिक शिक्षण वातावरण विकसित करण्यासाठी भारत आणि सिंगापूर यांच्यातील सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन-ITEमुख्यालय आणि सिंगापूरमधील ITEकॉलेज सेंट्रललाही भेट दिली.
Site Admin | August 26, 2024 9:27 AM | Piyush Goyal | Singapore