सर्वच क्षेत्रातल्या चौफेर प्रगतीमुळे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार, संशोधन आणि गुंतवणुकीसाठी जागतिक पातळीवर आकर्षण ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आज ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. डिजिटल भारत अभियानामुळे देशात क्रांती घडली असून भारत विदा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तत्संबंधी संशोधनाचं केंद्र बनला आहे असं ते म्हणाले.
अमेरिका आणि युकेमधल्या घडामोडींचा परिणाम भारताच्या ता देशांबरोबरच्या व्यापारी संबंधांवर होणार नाही असं सांगून ते म्णाले की संसदेचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर युके बरोबर मुक्त व्यापार कराराबाबत वाटाघाटी सुरु होतील.