डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आणि पर्यटन उद्योगासाठी भरीव तरतूद-पीयुष गोयल

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सातत्य आणि सर्वसमावेशकता असून सुमारे एक कोटी मध्यमवर्गीय कुटुंबं करमुक्त झाली आहेत, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. या करबचतीमधून जनतेच्या हातात  एक लाख कोटी रुपये येतील, हेच पैसे गुंतवणूक आणि व्यवहारात येऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं ते म्हणाले. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आणि पर्यटन उद्योगासाठी भरीव तरतूद केल्याचंही  त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा