केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी फ्रान्स आणि आशिया-पॅसिफिक भागीदार देशांनी परस्पर सहकार्य वाढवण्याचं आवाहन केलं आहे. ते काल नवी दिल्लीत, आशिया-पॅसिफिक क्षेत्रासाठीच्या, फ्रेंच विदेशी व्यापार आयुक्तांच्या वार्षिक परिषदेत बोलत होते. यामध्ये द्विपक्षीय करार आणि बहुपक्षीय मंचांद्वारे व्यापार संबंध वाढवणे, हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तांत्रिक सहकार्य मजबूत करणे आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण वाढवणे यांचा समावेश आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारत आणि फ्रान्स देशांमधील व्यापार १५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, अशी आशा गोयल यांनी यावेळी व्यक्त केली.
Site Admin | November 28, 2024 11:22 AM | Minister Piyush Goyal