वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या कालच्या पहिल्या दिवशी अनेक बैठका घेतल्या आणि भागधारकांशी संवाद साधला. बिझनेस कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेला गोयल उपस्थित होते. या बैठकीत भारताची मजबूत धोरणं आणि सुधारणांवर चर्चा झाली. भारतीय बाजारपेठेतली नवीकरणीय उर्जा, उत्पादन, शिक्षण, फिनटेक आणि ॲग्रीटेक यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी असल्याचं प्रतिपादन गोयल यांनी यावेळी केलं.
त्यानंतर त्यांनी सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींशीही संवाद साधला आणि ऑस्ट्रेलिया-भारत संबंधांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचं कौतुकही केलं.