राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात ८० लाख टन वर्गीकृत केलेल्या कचऱ्याचा वापर करण्यात आला असल्याचं काल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं सांगितलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यामुळं स्वच्छता अभियानाला हातभार लागत असून, रस्ते बांधताना करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. नागपूर महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील सांडपाणी औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पुरवलं जात असून, पेंच, कोराडी, खापरखेडा प्रकल्पातील आरक्षित पाणी आता शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी उपलब्ध असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
Site Admin | October 3, 2024 11:10 AM | Minister Nitin Gadkari