वाहन प्रवासी आणि वाहन कंपन्यांनी शाश्वत पद्धतींचा अवलंब करावा तसंच सीएनजी, हरित हायड्रोजन आणि जैव-इथेनॉल सारख्या पर्यायी, हरित इंधनाचा वापर करावा, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज उत्तर प्रदेशात गाझियाबाद इथं स्वच्छता ही सेवा या अभियानंतर्गत झालेल्या स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते आणि महामार्गांच्या बांधकामाच्या प्रक्रियेत निर्माण होत असलेल्या प्रदूषणकारी घटकांपासून पर्यावरणाचं रक्षण करायला सरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
यावेळी गडकरी यांनी राज्यमंत्री अजय टामटा आणि हर्ष मल्होत्रा यांच्यासह एक पेड मां के नाम या मोहीमेअंतर्गत वृक्षारोपणही केलं.