डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वीजनिर्मितीत हरित ऊर्जा निर्मितीचा वाटा ४२ % – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

देशात सध्या एकंदर वीजनिर्मितीच्या क्षेत्रात हरित ऊर्जा निर्मितीचा वाटा 42 टक्के इतका आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नवी दिल्लीत काल ३२व्या कनवर्जन्स इंडिया एक्सपो, स्मार्ट मोबईलीटी इंडिया एक्सपो आणि १०व्या स्मार्ट सिटी इंडिया कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.

 

मंत्री गडकरी म्हणाले.  केंद्र सरकार पर्यायी इंधन आणि आणि जैव इंधन निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. येत्या भविष्यात देशातील काही शहरांमधील प्रवासाचा वेळ अगदी कमी करण्याच्या दृष्टीने अनेक नवीन रस्ते प्रकल्प सुरू होत असून, त्याद्वारे दिल्ली – डेहराडून , दिल्ली – जयपूर तसच चेन्नई – बंगरुळू या शहरांमधील अंतर केवळ २ तासात पार करता येईल. तसच दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ १२ तासात करता येईल, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा